सातवाहन वंश
सातवाहन वंश : प्राचीन भारतातील एक बलाढ्य सुप्रसिद्घ राजवंश. या वंशातील राजांनी इ. स. पू. सु. दुसऱ्या शतकापासून इ. स. तिसऱ्या शतकादरम्यान मुख्यत्वे महाराष्ट्रात अधिसत्ता गाजविली. या वंशाविषयीची माहिती मुख्यत्वे त्यांची नाणी, शिलालेख, रुद्रदामनचा जुनागढ येथील प्रस्तरलेख, आपस्तंब धर्मसूत्र, वायु, विष्णु, मत्स्य आदी पुराणे; जैन ग्रंथ वगैरेंतून मिळते.